स्वप्नील जोशीचा ‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज

स्वप्नील जोशीचा ‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : वर्तमान काळाचं प्रेम मिळवण्यासाठी गेल्या ५ जन्मांच्या आपल्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का? नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज झाला आहे.
अधिक वाचा –

‘कल्कि 2898 एडी’ दुसरा ट्रेलर; दीपिकाची लक्षवेधी भूमिका (Video)

‘बाई गं’ चित्रपटाचा धमाल टीझर
नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ही गाठ कधीही कुठेही कशीही जुळते, पण ही गाठ किती वेळ टिकेल हे मात्र सांगणं कठीण आहे. आता आपलं हेच प्रेम टिकवायला एका नवऱ्याला चक्क ५ जन्मा आधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण या इच्छा तो पूर्ण करू शकेल का? हे येत्या १२ जुलैला आपल्याला ‘बाई गं’ या चित्रपटाद्वारे समजेल. या चित्रपटाचा धमाल टीझर रिलीझ झालाय.
अधिक वाचा –

डॉन २ नंतर शाहरुखसोबत फरहान अख्तरची पुन्हा हातमिळवणी

चित्रपटात तगडे कलाकार 
टीझरमध्ये स्वप्नील जोशीला किती कसरत करावी लागते हे दिसतंय. या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहेत.
अधिक वाचा –
Housefull 5 : फुल धमाका करायला येताहेत जॉन अब्राहम, बॉबी, अर्जुन रामपाल
“बाई गं” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. ‘बाई गं’ हा धमाल चित्रपट १२ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)