यवतमाळ : धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून करून मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून धामणगाव रेल्वे येथे रुळावर टाकल्याची घटना काल (दि.21) सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गजानन राठोड (वय ४२, रा.पहुर (दाभा) ता. बाभूळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दत्तापूर (ता. धामणगाव रेल्वे) पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. धामणगाव रेल्वे …

यवतमाळ : धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून करून मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून धामणगाव रेल्वे येथे रुळावर टाकल्याची घटना काल (दि.21) सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गजानन राठोड (वय ४२, रा.पहुर (दाभा) ता. बाभूळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दत्तापूर (ता. धामणगाव रेल्वे) पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
धामणगाव रेल्वे येथील मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळावर ब्लँकेटमध्ये बांधून संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून घटना उघडकीस आणली. पहूर (दाभा) येथील गजानन राठोड याचा विवाह तिवसा तालुक्यातील वीरगव्हाण येथील गंगाशी झाला. लग्नानंतर काही काळात कौटुंबिक कारणाने गंगा तीन वर्षे माहेरी होती. दरम्यानच्या काळात. वीरगव्हाण येथील सचिन श्रावण राठोड (वय ३०) याचे गंगाशी सूत जुळले. कौटुंबिक कलह मिटल्याने गंगा पुन्हा आपल्या सासरी आली.
दरम्यान, सचिन व गंगा यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण गजानन राठोड याला लागली होती. त्यामुळे सचिन राठोड व मृताची पत्नी गंगा यांनी संगनमत करून गजानन राठोड याला संपविण्याचा कट रचला. २० जून रोजी मध्यरात्री सचिन पहूर येथे गेला. घरात शिरला व निद्रावस्थेत असलेल्या गजाननचा गळा दाबून त्याला दोघांनीही जिवाने मारले. शुक्रवारी पहाटे गजाननचा मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून दुचाकीने धामणगाव येथे आणला. बायपास रस्त्यावरील रेल्वे पुलावरून मृतदेह अप रेल्वेवर फेकला.