सरकारविरोधात काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महायुती सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. राज्यातील सरकार हे असंवैधानिक असून शेतकरी, कामगार, तरुण, महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याकविरोधी आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. वाढती महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षेतील घोटाळा, खते, बियाणांचा काळाबाजार, वाढती गुन्हेगारी, अमली …
सरकारविरोधात काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील महायुती सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. राज्यातील सरकार हे असंवैधानिक असून शेतकरी, कामगार, तरुण, महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याकविरोधी आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
वाढती महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षेतील घोटाळा, खते, बियाणांचा काळाबाजार, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट, कायदा सुव्यवस्थाप्रश्नी हे आंदोलन करून महायुती सरकारचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. मुंबईत काँग्रेस कार्य समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप, चरणसिंह सप्रा, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. अमरजितसिंह मनहास यांनी चिखल फेको आंदोलनात सहभाग घेतला.
नागपूरमध्ये शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. नांदेडमध्ये खा. वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक, कोल्हापूर, गोंदिया, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, धुळे, वाशीम, जालना, अमरावती, अकोला, श्रीरामपूर, बुलढाणा जिल्ह्यांतही चिखल फेको आंदोलन करण्यात आले.