मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावजवळ भीषण अपघात; पोलीस हवालदार ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावजवळ भीषण अपघात; पोलीस हवालदार ठार

नांदगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव तिठ्ठा नजीक असलदे पियाळी पूलावरील दुभाजकाला कार धडकली. या अपघातात सिंधुदुर्ग महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार यशवंत भास्कर तांबे (वय ३५, रा. वैभववाडी) जागीच ठार झाले. ही धडक इतकी जोरात होती की गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. शनिवारी पहाटे ३:१५ वा. च्या सुमारास ही घटना घडली.
मुंबई-गोवा महामार्गावरून वैभववाडीच्या दिशेने यशवंत भास्कर व आणखी दोघेजण कारने जात होते. नांदगाव नजीक असणा-या असलदे पियाळी नदीच्या पूलावर आले असता मध्यभागी असणा-या दुभाजकाच्या संरक्षक कठड्याला कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या पूढील भागाचा चक्काचूर होत एअर बॅग खुल्या झाल्या. या अपघातात यशवंत तांबे जाणीच ठार झाले तर इतर दोघांमधील एक जण जखमी असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहीती मिळताच सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस, कणकवली पोलीस व स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानंतर काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नेमका अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : 

खालापूरला बंधाऱ्यात बुडून मुंबईतील चार युवकांचा मृत्यू
गॅस टँकर पलटी झाल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सहा तासानंतर पूर्ववत