वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून बांधले वृद्ध शेतकऱ्याचे हातपाय

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – यावल तालुक्यातील पाडळसा या गावात शेताला शेत लागून असलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये शेताच्या बांध आहे. या बांधावर लावण्यात आलेल्या वांग्याचे झाड तोडल्यावरून शेतकरी पिता-पुत्र यांनी वृद्ध शेतकऱ्यांचे दोऱ्याने हातपाय बांधले व बैलगाडीत टाकून थेट गावातील पीक सोसायटीत आणले. ही घटना गुरुवारी (दि.२०) रोजी झाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसात शेतकरी पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल …

वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून बांधले वृद्ध शेतकऱ्याचे हातपाय

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – यावल तालुक्यातील पाडळसा या गावात शेताला शेत लागून असलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये शेताच्या बांध आहे. या बांधावर लावण्यात आलेल्या वांग्याचे झाड तोडल्यावरून शेतकरी पिता-पुत्र यांनी वृद्ध शेतकऱ्यांचे दोऱ्याने हातपाय बांधले व बैलगाडीत टाकून थेट गावातील पीक सोसायटीत आणले. ही घटना गुरुवारी (दि.२०) रोजी झाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसात शेतकरी पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
यावल तालुक्यातील पाडळसा गावात एका ६१ वर्षीय वृध्द शेतकऱ्याने शेतीच्या बांधावरील वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून शेतकरी पिता- पुत्राने गुरूवारी (दि.२०) रोजी या वृध्दाचे दोराने हात पाय बांधले व बैलगाडीमध्ये टाकून थेट शेतातून गावातील पिक सोसायटीत आणतांना ग्रामस्थ देखील अंचबीत झाले आहेत. शेतकरी पितापुत्राच्या या कृत्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
असा घडला प्रकार….
यावल तालुक्यातील पाडळसा गावातील महादेव मंदिराजवळ राहणारे सुरेश नामदेव कचरे वय 61 हे शेतकरी असून गट क्रमांक 1237 मध्ये त्यांची शेती आहे. याच शेताच्या बाजूला शेतकरी रमेश दशरथ बोरसे यांची शेती आहे. शेतीच्या  बांधाला बांध लागून असल्यामुळे गुरुवारी (दि.२०) रोजी सकाळी सुरेश नामदेव कचरे काम करीत असताना बांधावरील वांग्याचे झाड त्यांनी उपटून फेकले. यावरून राग येऊन शेजारील शेतकरी रमेश दशरथ बोरसे व त्यांच्या मुलगा प्रकाश रमेश बोरसे (रा. पाडळसा, ता.यावल) यांनी शेतकरी सुरेश नामदेव कचरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच इतक्यावर त्यांचा राग शांत झाला नाही तर या शेतकरी पिता-पुत्राने वृद्ध शेतकऱ्याचे दोरीने हातपाय बांधून बैलगाडी टाकने. त्यानंतर सर्व ग्रामस्थांसमोर गावातील पीक सोसायटीत आणले.
हा प्रकार पाहून गावातील नागरिक यांनी संताप व्यक्त केला असून, वृद्ध शेतकऱ्याला बांधून आणल्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पिक सोसायटीत गर्दी केली आहे. या बाबत फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली असून घटनास्थळी सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकाऱ्यांनी धाव घेतली. तिघांनाही पोलीस ठाण्यात आणले आहे. याप्रकरणी वृध्दाच्या तक्रारीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयीतांनी देखील वयोवृद्धा विरोधात तक्रार दिल्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहेत.
हेही वाचा:

अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा: ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांची मागणी