रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मागण्यांचा पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबईदरम्यान सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान आणखी एक नवीन गाडी सुरू करा, कोल्हापूर अहमदाबाद, जोधपूर एक्स्प्रेसला कराडला थांबे द्या, महालक्ष्मी, हरिप्रिया एक्स्प्रेसचे रेक एलएचबीमध्ये परिवर्तित करा, पुणे-दौंडपर्यंत इलेक्ट्रिक मेमू सेवा सुरू करा, पुणे-बिकानेर एक्स्प्रेसचा कोल्हापूरपर्यंत विस्तार करा, विभागातील सर्व स्थानकांवर पुरेशा संकेत मार्गदर्शक फलक, सीसीटीव्ही बसवा, यांसारख्या विविध …

रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मागण्यांचा पाऊस

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे-मुंबईदरम्यान सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान आणखी एक नवीन गाडी सुरू करा, कोल्हापूर अहमदाबाद, जोधपूर एक्स्प्रेसला कराडला थांबे द्या, महालक्ष्मी, हरिप्रिया एक्स्प्रेसचे रेक एलएचबीमध्ये परिवर्तित करा, पुणे-दौंडपर्यंत इलेक्ट्रिक मेमू सेवा सुरू करा, पुणे-बिकानेर एक्स्प्रेसचा कोल्हापूरपर्यंत विस्तार करा, विभागातील सर्व स्थानकांवर पुरेशा संकेत मार्गदर्शक फलक, सीसीटीव्ही बसवा, यांसारख्या विविध समस्या आणि त्या पूर्ण करण्याच्या मागण्यांचा पाऊस शुक्रवारी (दि. 21) विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पडला.
पायाभूत समस्या अधिक
रेल्वेच्या पुणे विभागातील सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इंदू दुबे होत्या. या वेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्यासह पुणे विभाग सल्लागार समितीचे (डीआरयूसीसी) सदस्य उपस्थित होते. या वेळी सर्व सदस्यांनी पुणे विभागातील स्थानकांवरील पायाभूत समस्यांसह रेल्वेगाड्यांना थांबा देणे, गाड्यांचा विस्तार करणे, नवीन रेल्वेगाडी सुरू करणे, यांसारख्या विविध समस्या आणि मागण्यांचा पाढा वाचला.
तसेच, शेगाव-साईनगर-पंढरपूर डेमू सुरू करा, देहूरोड बेगडेवाडी स्थानकावर प्लॅटफॉर्म उंच करा, लोणंदला शरावती, पद्दुचेरी एक्स्प्रेसला थांबे द्या, कोयना एक्स्प्रेसला जनरल डबे वाढवा, बेलापूर गुड्स शेड स्थलांतरित करा, डेमू गाडीला 1400 एचपीतून 1600 एचपी परिवर्तित करून अतिरिक्त डबे जोडून कोल्हापूर आणि सांगलीकरिता सुरू करणे, लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा, सीसीटीव्ही, सुरक्षा, पार्किंगची समस्या दूर करणे, प्रवासी सुविधा विकसित करणे, रेल्वे परिसर अतिक्रमणमुक्त करणे, यांसारख्या मागण्या सदस्यांनी या वेळी केल्या. त्यासोबतच रेल्वे प्रशासन आमच्या या सर्व मागण्या पूर्ण कधीपर्यंत करणार, असा सवाल सदस्यांकडून करण्यात आला.
रेल्वे सुरक्षित आणि वेळेवर धावणे, ट्रॅकची योग्य देखभाल करणे, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात आहेत. पुणे रेल्वे प्रशासन प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. रेल्वेची विकासकामे, प्रवासी सुविधांचा विस्तार आणि महसूलवाढीसाठी सदस्यांनी अर्थपूर्ण प्रयत्न करून सहकार्य करण्याची गरज आहे.
– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा 

अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा: ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांची मागणी
पोलीस दलात होणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती