बीड : राष्ट्रीय महामार्गावरील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवले
धारुर; Bharat Live News Media वृत्तसेवा : धारूर येथील भारतीय स्टेट बँक तेलगाव रोड येथील एटीएम मशीन आज पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारूर-तेलगाव रोड जवळ असणाऱ्या भारतीय स्टेट बँकचे एटीएम मशीन आज (दि.22) पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. चोरीवेळी चोरट्यांनी नंबर प्लेट नसलेल्या पिक अपच्या सहाय्याने बाहेर काढून फरार झाले.
या चोरीमुळे धारूर परिसरामध्ये चोरांची दहशत बसली आहे. खामगाव-पंढरपूर मेन रोडवर असलेल्या एटीएम मशीनचीच चोरी करतात. ही मोठी बाब असून या चोरांच्या मुस्क्या पोलीस प्रशासनाने तात्काळ आवळल्या पाहिजेत. या चोरीमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.