सामाजिक समतोल राखण्याची जबाबदारी सरकारची: जयंत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाचा प्रश्न सरकारने समन्वयाने योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे. दोन समाजामध्ये वाद होणार नाही, सामाजिक समतोल बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मार्केट …

सामाजिक समतोल राखण्याची जबाबदारी सरकारची: जयंत पाटील

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाचा प्रश्न सरकारने समन्वयाने योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे. दोन समाजामध्ये वाद होणार नाही, सामाजिक समतोल बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
मार्केट यार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार, आमदार व पदाधिकार्‍यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीपूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आरक्षणावरून मराठवाड्यात मराठा व ओबीसी समाजात वाद पेटत असल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, काही जण राजकीय स्वार्थापोटी ठरावीक समाज एका बाजूला नेत आहेत. कोणावर अन्याय होणार नाही, दोन समाजात वाद होणार नाही, हे सरकारने पाहणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला समाजातील सर्वच घटकांनी मदत केली आहे. येणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितच लढणार आहे. कोण किती जागा लढवणार आहे, हे आताच सांगता येणार नाही. महाविकास आघाडीची सत्ता आणणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणूक झाल्यावर आघाडीतील सर्व पक्ष एकत्रित घेतील. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी आत्ताच कोणी घाई करू नये, असेही पाटील म्हणाले.
शरद पवार यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. बारामतीत कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पवार साहेब घेतील. आगामी निवडणुकीत गेलेले किती आमदार आमच्याकडे येणार, याबाबत मला कल्पना नाही. काही आमदार मला फोन करून बोलत आहेत, पण किती येणार याची अद्याप कल्पना नाही.
सरकारने सामाजिक स्वास्थ्य बिघडवले : आव्हाड
सरकारमधील जे लोक मराठा आंदोलकांशी चर्चा करत होते, तेच लोक आता ओबीसी आंदोलकांशी चर्चा करताना दिसतात. आरक्षणासंदर्भात संविधानानुसार निर्णय होणे गरजेचे आहे. मात्र, सरकार दोन समाजात वाद लावून राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहे. पत्ते बदलून जुगार खेळण्याची भाजपची सवय भारतीय लोकशाहीला घातक आहे, अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
गेलेल्या आमदारांमध्ये चुळबुळ : देशमुख
आमच्यापासून दूर गेलेल्या आमदारांमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर चुळबुळ सुरू झालेली आहे. अनेकांचे फोन येत आहेत. मात्र, याबाबतीत आमचे नेते शरद पवार निर्णय घेतील. महाविकास आघाडीला विदर्भात चांगले यश मिळाले असून, विधानसभा निवडणूकही आम्ही एकत्रित लढणार आहोत. आमच्यामध्ये कोणीही मोठा भाऊ आणि लहान भाऊ नाही, असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

हेही वाचा 

शरद पवारांची विधानसभेसाठी खलबते; नवनिर्वाचित खासदारांसोबत चार तास बैठक
कोल्हापुरात मंगळवारी रिक्षा, टॅक्सी बंद
बीड : राष्ट्रीय महामार्गावरील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवले