पुणे : चक्रपाणी वसाहत येथे डबक्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू
पिंपरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : घराच्या अंगणात खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या डबक्यात पडून तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १०) दुपारी अडीचच्या सुमारास चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली. गणेश बालाजी मंजलवार (वय ३) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजलवार कुटुंबीय भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीमध्ये राहतात त्यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास चिमुरडा गणेश मित्रांसोबत अंगणात खेळत होता. त्यावेळी तोल गेल्याने गणेश डबक्यात पडला. गणेशसोबत खेळत असलेल्या मुलांनी त्याच्या आईला याबाबत माहिती दिली. आईने धावत जाऊन गणेशला डबक्याबाहेर काढले. गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. गणेशच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास गाडे करत आहेत.
हेही वाचा :
जळगाव : पाटचारीतील पाण्यात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
Nashik Crime News | डंपर मागे घेताना चिरडून एकाचा मृत्यू
दुर्दैवी: विक्रोळी येथे इमारतीचा भाग कोसळून पितापुत्राचा मृत्यू