लडाखमधील अपक्ष खासदाराचा काँग्रेसला पाठिंबा

लडाखमधील अपक्ष खासदाराचा काँग्रेसला पाठिंबा

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लडाखचे अपक्ष खासदार मोहम्मद हनीफा यांनी मंगळवारी (दि.११) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. हनिफा यांना मिळून आतापर्यंत ३ अपक्ष खासदारांनी काँग्रेस आणि इंडीया आघाडीला पाठिंबा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेऊन काँग्रेसला पाठिंबा दिला. बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनीही गांधी परिवाराची भेट घेऊन काँग्रेससोबत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अपक्ष खासदार मोहम्मद हनीफा यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. तीन अपक्ष खासदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांची संख्या २३७ वर पोहोचली आहे.
हेही वाचा :

राज्यसभेच्या दहा रिक्त जागा भाजपच्या झोळीत जाणार?
Chandrababu Naidu : अमरावती हीच आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी! चंद्राबाबू नायडू यांची मोठी घोषणा
एनडीए सरकारच्या सर्वच मंत्र्यांनी स्वीकारला खात्याचा कार्यभार