खासदार भुमरेंचे जरागेंना आवाहन; म्हणाले उपचारासाठी सहकार्य करावे

खासदार भुमरेंचे जरागेंना आवाहन; म्हणाले उपचारासाठी सहकार्य करावे

वडीगोद्री; Bharat Live News Media वृत्तसेवा : जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेवून आरोग्य विभागाला उपचारासाठी सहकार्य करावे अशी विनंती छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी केली. आज (दि.11) सायंकाळी त्यांनी अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंसोबत सुमारे पाऊनतास चर्चा केली.
यावेळी खा.संदीपान भुमरे म्हणाले की, आम्हाला तुमची गरज आहे. जरांगे-पाटील तुमच्या मागण्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतो. आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या विषयी चर्चा करणार असून, लवकरच तोडगा काढून योग्य मार्ग निघेल. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. आरक्षणाबाबत निश्चितच मार्ग निघेल. यावेळी भुमरे यांनी जरांगेंना उपचार घेण्यासाठी आवाहन केले. परंतु, मनोज जरांगे-पाटील उपचार न घेण्याच्या भुमिकेवर ठाम राहिले.