मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर, गडकरी तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक मंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : NDA Cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुस-याअ दिवशी मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात भाजपाचे नितीन गडकरी यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय (Union Ministry of Road Transport) देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर हर्ष मल्होत्रा परिवहन राज्य मंत्री असणार आहेत. …

मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर, गडकरी तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक मंत्री

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : NDA Cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुस-याअ दिवशी मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात भाजपाचे नितीन गडकरी यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय (Union Ministry of Road Transport) देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर हर्ष मल्होत्रा परिवहन राज्य मंत्री असणार आहेत. अमित शाह यांच्याकडे गृह खाते सोपवण्यात आले आहे. एस जयशंकर हे पुन्हा परराष्ट्र खातं सांभाळतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी रविवारी राष्ट्रपती भवनातील शानदार समारंभात पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे.