मित्रपक्षांना वापरून फेकणे हेच भाजपचे धोरण : यशोमती ठाकूर

मित्रपक्षांना वापरून फेकणे हेच भाजपचे धोरण : यशोमती ठाकूर

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : मित्रपक्षांचा वापर करून घ्यायचा आणि गरज संपल्यावर त्यांना फेकून द्यायचे हेच भाजपचे धोरण आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी (दि.10) नवी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना केली.
या बरोबरच अमरावतीतून निवडून आल्यानंतर महायुतीचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. यानंतर नरेंद्र मोंदीचा शपथविधी पार पडल्यांनतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला होता. यादरम्यान अज्ञात व्यक्तींनी वानखेडेंचे बॅनर फाडले होते. या घटनेचा संताप देखील व्यक्त केला. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
खासदार वानखेडे यांच्या विजयाचे बॅनर फाडण्याच्या प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. माजी खासदारांनी उद्योजकांना त्रास दिल्यामुळे काही प्रकल्प अडकून पडले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी काहीही केले नाही, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांचे नाव न घेता केला. या बरोबरच विरोधक छोट्या मनाचे असल्याने पराभव पचवू शकले नाही. त्यामुळे त्यांनी बॅनर फाडण्याचा प्रकार केल्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :

केंद्रीय मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला कोणतं पद
NDA Cabinet : मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर, नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक मंत्री
तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करण्याऱ्या डॉ. अशोक बागुलांना काही तासांतच जामीन !