नांदेड: बिजूर शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

नांदेड: बिजूर शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

शंकरनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा: नांदेड- देगलुर राज्य महामार्गावर असलेल्या बिजूर शिवारात एका अज्ञात अनोळखी तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची रामतीर्थ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अजनी फाटा येथून एक किलोमीटर अंतरावर बिजूर तालुका बिलोली येथील मोहन लालू राठोड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाजवळ अंदाजे वय 40 ते 45 वर्षे वयाच्या उंची 167 सेंटीमीटर, वर्ण काळा सावळा, बांधा मजबूत अंगावर बदामी कलरची फुल पॅन्ट घातलेली असलेल्या एका अज्ञात सदरील वर्णन असलेल्या तरुणाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी (दि. 9) आढळून आला. या घटनेची बिजूर येथील पोलीस पाटील शिवराज सिंनगारे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप यांनी घटनेचा पंचनामा केला.
शंकरनगर परिसरात ६ जूनरोजी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात या तरुणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. मृतदेह पूर्णपणे सडल्याने रामतीर्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरसे यांना घटनास्थळी बोलावून मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांचे तेथेच रात्री उशिरा दफन करण्यात आले. रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरवाडे पुढील तपास करत आहेत.
वरील वर्णनाच्या तरुणाची कुणाला ओळख असेल किंवा सदरील वर्णनाचा कोणाच्या घरातील व्यक्ती हरवलेला असेल . या व्यक्ती संबंधी कोणाला काही माहिती असल्यास रामतीर्थ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे
हेही वाचा 

 नांदेड: बेट सांगवी येथे विहिरीत पोहताना शॉक लागून दोघांचा मृत्यू
नांदेड : चॉकलेटचे अमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; नराधमास अटक
नांदेड : बिलोली तालुक्यात जोरदार पाऊस; वीज पडून बैलाचा मृत्यू