केंद्रीय मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला कोणतं पद

केंद्रीय मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला कोणतं पद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९३ जागा जिकंत तिसऱ्यांदा बहुमत मिळवले. त्यानंतर रविवारी (दि.९) नरेंद्र मोदी याचा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असून सोमवारी (दि.१०)  केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप  करण्यात आले.
यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रीपद कायम ठेवण्यात येणार असून अमित शहा यांच्याकडे पून्हा केंद्रीय गृहराज्यमंत्रीपद असणार आहे. तसेच अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांना रस्ते विकास राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. तसेच आश्विन वैष्णव रेल्वेमंत्रीपद असणार आहे. राजनाथ सिंह यांना पुन्हा संरक्षणमंत्रीपद देण्यात आले आहे.