नागपूर: कुलरने घेतला तिघांचा बळी; घरातील यमदुताला वेळीच आवरा
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: काटोल तालुक्यातील वाढोणा येथे मावशीकडे गंगापूजनासाठी आलेल्या 7 वर्षीय शिवम मोहरिया याचा कुलरला हात लागल्याने विजेचा धक्का बसून मृत्य झाला. तर शुक्रवारी (दि. 7) नागपूर शहरातील इमामवडा येथील 7 वर्षीय रुतवा बगडे याचा घरातील कुलर सुरु करताना विजेचा धक्का बसून मृत्य झाला. याशिवाय 30 एप्रिलरोजी बारा सिग्नल जवळील बोरकर नगर येथील 6 वर्षीय आकांक्षा संदेले या मुलीचा खेळताना कुलरला हात लागल्याने मृत्यू झाला. अशाप्रकारे जिल्ह्यातील तीन मुलांचा कुलरने बळी घेतला. अशा घटना टाळण्यासाठी कुलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
घरातील यमदुताला वेळीच आवरा, महावितरणचे आवाहन
कुलरचा वापर सदैव थ्री पीन प्लगवरच करावा
अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे
थेट जमिनीसोबत संपर्क येईल, असा कुलर बसवा
कुलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही, याची काळजी घ्यावी,
कुलरची अशी हाताळणी करा.
ग्राहकांनी कुलरचा वापर सदैव थ्री पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे, घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी. कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीज पुरवठा येऊ नये, याकरिता कुलरचा थेट जमिनी सोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीज प्रवाहीत झाल्यास त्याचा धक्का लागणार नाही. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कुलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे, कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडली नसल्याची खात्री करून घ्यावी, कुलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही, याची काळजी घ्यावी.
ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये
ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये, कुलरची वायर सदैव तपासून बघा. फायबर बाहयभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कुलरचा वापर प्राधान्याने करा. घरातील मुले व इतर सदस्य कुलरच्या सानिध्यात येणार नाही, याची खबरदारी घेऊनच कुलर ठेवण्यात यावा. कुलरमधील पाण्याचा पंप 5 मिनिट सुरू व 10 मिनिट बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रीकल सर्किटचा वापर करा. यामुळे विजेचीही मोठया प्रमाणात बचत शक्य आहे. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर इभे राहून टुल्लू पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल. तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करून त्याचा प्लग काढल्यानंतरच पंपाला हात लावावा, पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी.
तसेच पंपाला वीज पुरवठा करणारी वायर पाण्यात बुडली नसावी, पंपाचे अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे, पंपातून नळ वाहिनीत वीज प्रवाहीत होणार नसल्याची काळजी घ्यावी. बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचल्या जात नाही. व तो पंप एअर लॉक होतो. अशा वेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते, बरेचदा अपु-या ज्ञानामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केल्या जाते. अशा वेळी वि0जेचा धक्का बसण्याची शक्यता असते. त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा
नागपूर : मोदी, गडकरींची हॅट्ट्रिक, लाडू वाटत कार्यकर्त्यांचा जल्लोष
नागपूर : रामटेकचा पराभव महायुतीच्या जिव्हारी, सुरू झाल्या तक्रारी
RSS सोबत नागपूरमध्ये २ तासांची बैठक, देवेंद्र फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना कोणता सल्ला दिला?