बिग बॉस OTT 3 प्रोमो आऊट! दमदार ड्रामामध्ये होस्ट करणार अनिल कपूर

बिग बॉस OTT 3 प्रोमो आऊट! दमदार ड्रामामध्ये होस्ट करणार अनिल कपूर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बहुप्रतीक्षित रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ चा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांना आता शो बद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेक्षक या शोसाठी वाट बघत आहेत. प्रोमोमध्ये अनिल कपूरला शोचा नवीन होस्ट अशी ओळख करून देण्यात आली असून बिग बॉसच्या घराप्रमाणेच या प्रोमोमध्ये देखील दमदार ड्रामा दिसतोय. मेगास्टार अनिल कपूर त्याच्या अनोख्या शैलीने घरात धम्माल करणार आहे. बिग बॉस ओटीटीचे मागील सीझन करण जोहर आणि सलमान खान यांनी होस्ट केले होते.
अधिक वाचा-

समीरा रेड्डीला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा दिला होता सल्ला; इतक्या वर्षांनी केला खुलासा

प्रत्येक सीझन हा तितकाच खास ठरला आणि तो अनोखा देखील झाला आता आगामी सीझन अनिल कपूर कसे स्पर्धकांना कसं हॅण्डल करणार, हे बघण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
अधिक वाचा-

काल शपथ घेतली पण आता मंत्रीपद सोडायचे आहे, केरळचे एकमेव भाजप खासदार सुरेश; सांगितले ‘हे’ कारण…

रिॲलिटी शोचा हा अत्यंत प्रतीक्षेत असलेला सीझन २१ जूनपासून OTT वर प्रसारित होणार आहे. दरम्यान थिएटरच्या आघाडीवर अनिल कपूरने अलीकडेच ‘ॲनिमल’, ‘फायटर’ आणि ‘क्रू’ या त्याच्या निर्मिती उपक्रमासह सलग हिट चित्रपट दिले. आता तो सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे. या पलीकडे, अभिनेता YRF स्पाय युनिव्हर्समध्ये पाऊल ठेवत असल्याची अफवा आहे.
अधिक वाचा-

दीपिका पादुकोणचा शानदार अंदाज; ‘कल्कि 2898 AD’चं पोस्टर रिलीज

 

View this post on Instagram

 
A post shared by JioCinema (@officialjiocinema)