खासदार शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

खासदार शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून आले. शाहू महाराज यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे संघटन सचिव के.सी. वेणूगोपाल यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज (दि.१०) मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी शाहू महाराज यांच्यासोबत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी आमदार मालोजीराजे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा 

कोल्हापूर : खा. शाहू महाराज यांची दै.‘Bharat Live News Media’स भेट
Lok Sabha Election 2024 Results : पहिल्या फेरीपासूनच शाहू महाराज आघाडीवर
काँग्रेसच्या यादीत शाहू महाराज 342 कोटींच्या मालमत्तेसह आघाडीवर