एमपीडीए कायद्यान्वये वर्ध्यातील एकावर स्थानबद्धतेची कारवाई

एमपीडीए कायद्यान्वये वर्ध्यातील एकावर स्थानबद्धतेची कारवाई

वर्धा, Bharat Live News Media वृत्तसेवा : वर्धा येथीस कुख्यात गावगुंड आफताब उर्फ सोहेल उर्फ मोंडा अखील खान (वय, 23 रा. स्टेशन फैल, वर्धा) याच्यावर वर्धा पोलिसांकडून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड याच्याविरूध्द भारतीय दंड विधान, हत्यार कायदा, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा यासारख्या कायद्यान्वये सन 2016 ते 2024 या कालावधीत 24 गुन्ह्यांची नोंद आहे.
आफताबवर हा दुखापत, जबरी चोरी, दरोडा, गृहअतीक्रमण, शासकीय कर्मचार्‍यावर हल्ला, गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. मागील 8 वर्षांमध्ये स्थानबध्द इसमाने वर्धा शहर, रामनगर, हिंगणघाट परिसरात दहशत निर्माण केली होती. जिल्हादंडाधिकारी यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून आफताब उर्फ सोहेल उर्फ मोंडा अखील खान याच्याविरूद्ध स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. सदर आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आफताब खान यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द काढण्यात आलेला स्थानबध्द आदेश पंच करुन त्याला नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे पुढील एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, ठाणेदार पराग पोटे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, अमोल आत्राम, प्रदीप वाघ, गोपाल बावनकर, प्रदीप राऊत, दीपक जंगले यांनी केली.
हेही वाचा :

Yavatmal News : वरुडखेड येथील सरपंच, उपसरपंच 75 हजारांची लाच घेताना जाळ्यात
आम्‍ही राज्‍यमंत्रीपदाची ऑफर नाकारली : अजित पवार
Nashik News : अपुऱ्या मनुष्यबळावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार