पूंछमध्ये ‘एनसी’च्या ‘रोड शो’वेळी चाकू हल्ला, तिघे जखमी

पूंछमध्ये ‘एनसी’च्या ‘रोड शो’वेळी चाकू हल्ला, तिघे जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात आज (दि.१९) नॅशनल कॉन्फरन्सच्या (एनसी) रोड शोदरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात तीन जण जखमी झाले. नॅशनल कॉन्फरन्सचे माजी आमदार जावेद राणा यांनी या घटनेला सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि अनंतनागमधील पक्षाचे उमेदवार मियाँ अल्ताफ राजौरी एका जाहीर सभेला संबोधित करत असताना मेंढर भागात ही घटना घडली. जखमी नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते आहेत. त्यांना ss-fhM मेंढरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्‍यात आला आहे.
या घटनेसंदर्भात बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे माजी आमदार जावेद राणा म्‍हणाले की, “आमच्या तरुणांवर अशा सुरक्षेदरम्यान हल्ला झाला आहे. पोलिसांनी तत्‍काळ हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई करावी.”
हेही वाचा :

Lokshabha Elections : राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत चेंगराचेंगरी, कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडली
Swati Maliwal assault case | स्वाती मालीवाल प्रकरण: केजरीवालांच्या घरातील CCTV, डीव्हीआर जप्त