आनंद वार्ता: मान्सून आला; अंदमान-निकोबार-बंगालच्या उपसागरात आगमन

आनंद वार्ता: मान्सून आला; अंदमान-निकोबार-बंगालच्या उपसागरात आगमन

पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : उकाड्याने हैराण झालेल्या तमाम भारतीयांसाठी मान्सूनची आंदवार्ता आहे.तो वेगाने प्रवास करीत अवघ्या आज रविवारी १९मे रोजी दुपारी 3 च्या सुमारास अंदमान – निकोबार बेटांसह आग्नेय बंगालचा उपसागरात येऊन धडकला आता तो बंगालच्या उपसागरात प्रगती करेल.31 मे ते 4 जून या कालावधीत तो केरळ मध्ये येण्याची शक्यता हवामान शस्त्रज्ञानी वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाप्रमाणे मॉन्सून 19 मे दुपारच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर आला.मागच्या वर्षीच्या तुलनेत तो 3 दिवस आधी आला आहे.