२२ मे पर्यंत ‘या’ राज्यांना अति मुसळधारेचा इशारा

२२ मे पर्यंत ‘या’ राज्यांना अति मुसळधारेचा इशारा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: यंदा शुक्रवार ३१ मे रोजी एक दिवस आधीच मान्सून भारतातील केरळमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार २२ मे पर्यंत भारतातील बहुतांश राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान भारताच्या दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश राज्यांना मान्सूनपूर्व पावसाचा (Pre Monsoon) इशारा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने एक्स पोस्टवरून दिली आहे.
हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, ” २२ मे पर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये वेगळ्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. तसेच गुरूवार १६ मे ते सोमवार २० मे दरम्यान तामिळनाडू तर सोमवार २० मे पर्यंत केरळमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Pre Monsoon) भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Wet spell with isolated heavy to very heavy rainfall very likely to continue over south Peninsular India till 22nd May, 2024.
Isolated extremely heavy rainfall also very likely over Tamil Nadu on 16th & 20th and Kerala on 20th May, 2024. pic.twitter.com/jSdtPrvS4Y
— India Meteorological Department (@Indiametdept) May 16, 2024

Pre Monsoon: वायव्य भारतात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट
तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये शुक्रवार १७ ते रविवार १९ मे, केरळ आणि माहेमध्ये १८ मे आणि १९ मे तर  दक्षिण  कर्नाटकमध्ये  शनिवार १८ मे ते २० मे दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे.  तसेच वायव्य भारत आणि बिहारमध्ये पुढील ५ दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान शनिवार १८ मे रोजी  पूर्व आणि मध्य भारतात उष्णतेची लाट सुरू होईल, असे देखील हवामान विभागाने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा:

Monsoon 2024 Update: गुडन्यूज | मान्सूनच्या केरळ आगमनाची तारीख ठरली ! ‘या’ तारखेला होणार दाखल
Monsoon Update | मान्सून वेळेआधीच अंदमानात; यंदा कशी असेल पावसाची स्थिती?
Monsoon Forecast | यंदा मान्सूनचे आगमन लवकर, IMD ने सांगितली तारीख