Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झारखंडचे मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना आज (दि.१६) रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने ३७ कोटी रुपये जप्त केल्या प्रकरणी ६ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
झारखंडमधील ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ‘ईडी’ने रांचीमधील एका फ्लॅटवर छापा टाकला.
हा फ्लॅट मंत्री आल यांचे पीए संजीव लाल यांचा नोकर जहांगीर आलम याचा आहे.
ईडीने या फ्लॅटमधून ३७ कोटींहून अधिक रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली होती.
१४ मे रोजी चौकशीला हजर राहण्याचे आलम यांना आदेश
#WATCH | Jharkhand Minister and Congress leader Alamgir Alam being taken from Special PMLA court in Ranchi
He has been sent to ED remand for six days in connection with the recovery of huge cash from the household help of his PS Sanjeev Lal pic.twitter.com/KtcUHpzgDM
— ANI (@ANI) May 16, 2024
७० वर्षीय काँग्रेस नेते आलमगीर आलम हे झारखंडमध्ये ग्रामीण विकास मंत्री आहेत. विधानसभेच्या पाकूर मतदारसंघाचे ते आमदार आहेत. ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमितता प्रकरणी झारखंड ग्रामीण विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र के राम, ज्यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासासंदर्भात छापे टाकण्यात आले होते. विभागातील काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी त्याचा संबंध आहे.
2019 मध्ये, वीरेंद्र के रामच्या अधीनस्थांपैकी एकाकडून मोठ्या प्रमाणात रोख जप्त करण्यात आली होती. नंतर, अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंध (पीएमएलए) कायद्यांतर्गत प्रकरण ताब्यात घेतले.झारखंड लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) च्या तक्रारीवरून वीरेंद्र के राम विरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला सुरु आहे.
बेहिशेबी रोकड जप्त प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आलमगीर आलम यांना समन्स बजावले. त्यांना १४ रोजी राजधानी रांचीत ईडीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती. आजच्या सुनावणीनंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल कुमार म्हणाले की, आम्ही आलम यांना १० दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली हाेती. मात्र न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची कोठडी सुनावली आहे.