पणजी : अंगावर वीज कोसळून केरळच्या पर्यटकाचा मृत्यू; पत्नी जखमी

पणजी : अंगावर वीज कोसळून केरळच्या पर्यटकाचा मृत्यू; पत्नी जखमी

पणजी; दीपक जाधव : मिरामार किनार्‍यावर समुद्र पर्यटनासाठी गेलेल्या केरळ-एर्नाकुलममधील एका पर्यटकाच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. अखिल विजयन (वय ३५) असे मृत तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल विजयन हा कुटुंबीय व मित्रांसह गोव्यात पर्यटनासाठी आला होता. रात्री विजांच्या कटकडाटासह सुरू असलेल्या पावसात भिजत आपल्या वाहनाकडे जात असताना अखिल विजयन याच्या अंगावर वीज कोसळली. यात त्याची पत्नी आणि एकजण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून गोमेकॉत नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अखिल यांना मृत घोषित केले.
हेही वाचा : 

पणजी : सुट्टीला मामाकडे आलेला मुलगा वेंगुर्ला-मांडवी खाडीपात्रात बुडाला
गोवा : बांबोळीत 2 सिलिंडर्सच्या स्फोटांत 10 झोपड्या खाक