मनोज जरांगेंची ८ जूनची बीडमधील सभा रद्द

मनोज जरांगेंची ८ जूनची बीडमधील सभा रद्द

बीड, Bharat Live News Media वृत्तसेवा : बीडच्या नारायणगड येथे 8 जून रोजी होणारी सभा पुढे ढकलली आहे, आता त्या सभेच्या अनुषंगानेच ४ जून उपोषणाची तारीख जाहीर केली होती. परंतु सभा पुढे ढकलल्याने मी त्याआधीच उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली. बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत. बीडच्या जिल्हा रुग्णालयात जरांगे पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बीडमध्ये सुरू असलेला प्रकार निवडणुकीनंतर होणे मला अपेक्षितच होते. मराठा मतांची यांना गरज आहे, परंतु मराठा समाज बांधवांची नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. मलाही आता धमक्या येत आहेत. तुझ्याकडे बघून घेऊ, तुला जीवे मारू, असे म्हटले जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असे देखील म्हटले जात आहे. परंतु मुंडे बहीण-भावाने एक लक्षात घ्यावे, मला बीडमध्ये येऊ दिले नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी बलिदानाची देखील माझी तयारी असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 

ओबीसींच्या आरक्षणाची लूट करण्याचा काँग्रेसचा डाव : पंतप्रधान मोदी
घटलेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय; राजकीय नेत्यांवरील विश्वासार्हता झाली कमी