गृहभेटीद्वारे मतदान वाढीसाठी प्रयत्न करावा : विशाल नरवाडे
धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- गृहभेटी कार्यक्रमाद्वारे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यास मतदानाची टक्केवारी वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी धुळे पंचायत समिती येथे गृह भेटीसाठी नेमलेल्या संपर्क अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.
काय केल्या सूचना ?
गृहभेटीचे सूक्ष्म नियोजन करावे.
त्यातून मतदानाची टक्केवारी वाढीसाठी प्रयत्न करावे.
20 मे ला मतदान
धुळे लोकसभा मतदार संघासाठी सोमवार, दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान होत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे यांच्या सूक्ष्म नियोजनानुसार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट साक्री व शिरपूर तालुक्यात गृहभेटी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 13 मे, 2024 रोजी झालेल्या मतदानात मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला आहे. याच धर्तीवर 20 मे रोजी होणाऱ्या धुळे व शिंदखेडा तालुक्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
जिल्हास्तरावर खाते प्रमुखाची नेमणुका
यासाठी धुळे ग्रामीण मतदार संघात 375 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रासाठी धुळे तालुक्यातील 138 अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्येकी तीन ते चार मतदान केंद्र संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या केंद्र संपर्क अधिकारी मार्फत 20 मे 2024 रोजी गावस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने गृहभेटी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराने मतदान केले आहे किंवा नाही. जे मतदार मतदान करायचे राहिले असतील त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणार आहे. यासर्वांचे पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हास्तरावर खाते प्रमुखाची नेमणुका करण्यात आली आहे. तसेच गृहभेटीचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
बैठकीत यांची उपस्थिती
या बैठकीस गणेश चौधरी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, धुळे, सुरेखा देवरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, धुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तुषार तिवारी, विस्तार अधिकारी, कृषी यांनी तर प्रास्ताविक विठ्ठल घुगे, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले.
हेही वाचा –
चंदगड : टेम्पोच्या धडकेत तडशिनहाळच्या युवकाचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर
Lok Sabha Election 2024 | ना महायुती, ना मविआ; ‘स्वराज्य’चा नारा विधानसभा
Mango Export | नाशिकच्या लासलगावमधून दीड महिन्यात ६०० टन आंब्यांची परदेशवारी