रोटावेटर मध्ये अटकून तरूणाचा मृत्यू

रोटावेटर मध्ये अटकून तरूणाचा मृत्यू

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात शेतात रोटावेटर करीत असताना ड्रायव्हरच्या मागच्या साईडला तोल गेला. रोट्याव्हेटर मध्ये अटकून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन दुदैवी मृत्यु झाला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालक्यातील डांभुर्णी येथील राहणारा विजय जानकीराम कोळी बाविस्कर (वय ३५) हा रोटावेटर करण्यासाठी शेतात गेलेला होता. १४ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मागील बाजूस रोटावेटर मध्ये अटकून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. याबाबत केतन रेवा पालक यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल वासुदेव मराठे हे करीत आहेत.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
सदर मयताचे मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अत्यंत शोकाकुल परिस्थितीमध्ये डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मयत विजय कोळी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
हेही वाचा –

परभणी: रुंज येथे जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग
मोठी बातमी! महादेव अँप प्रकरणी नारायणगावला छापा
Stock Market Closing Bell | शेअर बाजारात चढ-उताराचा खेळ, सेन्सेक्स- निफ्टी सपाट