केंद्रात सरकार आल्यास ‘मराठी’ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा-काँग्रेस

केंद्रात सरकार आल्यास ‘मराठी’ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा-काँग्रेस

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा: देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास ‘मराठी’ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल, अशी मोठी घोषणा काँग्रेसने केली आहे. यापूर्वी आठवडाभरात दोन वेळा केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही, असा प्रश्न काँग्रेसने विचारला होता. त्यांनतर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान होत असताना आज (दि.१३) ही मोठी घोषणा (Congress) केली आहे.
मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही?
गेल्या दहा वर्षात ‘मराठी’ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही? असा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दोनदा काँग्रेसने (Congress) विचारला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा महाराष्ट्रात महत्वाचा ठरणार आहे. यानिमित्ताने मराठी अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.
‘इंडिया’ आघाडीचे सरकार येताच, ‘मराठी’ला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा
काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत सांगितले की, ‘देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल’. जयराम रमेश म्हणाले की, “डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देण्यात आला. ११ जुलै २०१४ ला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा घोषित करण्याची मागणी केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून काहीही केले नाही. देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित केले जाईल, असे वचन काँग्रेस पक्ष (Congress) देत आहे.”

काय आहे ‘मराठी’ला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा

काँग्रेस सरकारमध्ये डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषांचा दर्जा.
११ जुलै २०१४ ला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा घोषित करण्याची मागणी
त्यानंतर २०२२ मध्ये खासदार रजनी पाटील यांच्याकडूनही मराठी भाषेच्या दर्जावर राज्यसभेत प्रश्न उपस्थित
काँग्रेच्या या मागणीवर केंद्र सरकार निष्क्रिय
लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात सरकार आल्यास ‘मराठी’ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काँग्रेसचे महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन

डॉ.मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषा म्हणून दर्जा देण्यात आला होता.
11 जुलै 2014 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित करण्यासाठी अहवाल… https://t.co/4jMYgoUEEu
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 13, 2024

काँग्रेस नेत्यांकडून वारंवार मागणी, परंतु केंद्र सरकार यावर निष्क्रिय
यापूर्वी दोनदा जयराम रमेश यांनी याच मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रंगनाथ पठारे समितीच्या अहवालाचा दाखल देत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये खासदार रजनी पाटील यांनी यासंदर्भात राज्यसभेत प्रश्न विचारला होता. या दोन्ही मागण्यांचा दाखला देत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेबद्दल महाराष्ट्रातील मतदार केंद्र सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवेल, असा इशाराही काँग्रेसने दिला होता.

हेही वाचा:

Rahul Gandhi : निवडणुकीत भाजप रोजगारावर गप्प का?; राहुल गांधींचा घणाघात
Amit Shah Dhule Sabha |…म्हणून राहुल, उद्धव राम मंदिराच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले; अमित शहांचा घणाघात
Lok Sabha Election 2024 : ‘महिला मतदारांच्या चेहऱ्यावरील बुरखा हटवला, ओळखपत्र तपासले’; भाजप उमेदवार माधवी लतांवर गुन्हा दाखल