मला आई व्हायचं होतं, पण ओवेरियन कॅन्सरने मातृत्व हिसकावून घेतलं…

मला आई व्हायचं होतं, पण ओवेरियन कॅन्सरने मातृत्व हिसकावून घेतलं…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या ‘हिरामंडी’ या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. यामध्ये मनिषा कोईरालाच्या दमदार अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. ‘हिरामंडी’मध्ये मनिषा कोईरालाने मल्लिकाजानची भूमिका साकारली आहे.
‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ रिलीज होऊन अनेक दिवस झाले आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस ही वेब सीरीज उतरली आहे. मनिषाने एका मुलाखतीत आपल्या खासगी जीवनाविषयी आणि प्रोफेशनल लाईफ विषयी चर्चा केली. आता मनीषाने मोठा खुलासा केली आहे की, तिला आई व्हायचं होतं. पण, तिचे स्वप्न कघी पूर्ण झाले नाही.
काय म्हणाली मनिषा कोईराला?
मनिषा म्हणाली, “माझ्या लाईफमध्ये काही न काही तरी अपूर्ण आहे. जसे-जसे तुम्ही मोठे होता, तुम्ही तुमच्या संबंधित सर्व सत्याचा स्वीकार करू लागता. अशी खूप स्वप्न असतात, ज्याबद्दल तुम्हाला अनुभव येतो की, ते कधी पूर्ण होणार नाहीत. तुम्ही त्याच्याशी समझौता करता. मदरहुड देखील माझ्यासाठी त्यापैकी एक आहे. ओवेरियन कॅन्सर होणं आणि आई होऊ न शकणं, खूप कठीण समस्या होती. पण मी त्याच्याशीही समझोता केला. मी स्वत:ला म्हणते, जे झालं ते झालं, आता माझ्याकडे जे आहे, त्याला मला बेस्ट करायचे आहे.”
मनिषाने मुल दत्तक घेण्याचा विचार केला होता?
ती पुढे म्हणाली, “मी मुल दत्तक घेण्याविषयी मी खूप विचार केला. मला जाणीव झाली की, मी लगेच चिंतेत होते. त्यामुळे खूप विचाराअंती मी समझोता केली की, मला गॉडमदर बनायला आवडेल. माझ्याकडे माझे वृद्ध आई-वडील आहेत, ज्यांच्यावर मी खूप प्रेम करते. मी वेळ मिळाला की काठमांडू जाते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते. मला खूप आनंद मिळतो.”

 

View this post on Instagram

 
A post shared by Netflix India (@netflix_in)

 

View this post on Instagram

 
A post shared by Netflix India (@netflix_in)

हेही वाचा – 

Sanjeeda Sheikh : अचानक घटस्फोट; सिंगल मदर बनून मुलीचं संगोपन, ‘हिरामंडी’ ची’ही’ अभिनेत्री चर्चेत
दिव्यांका त्रिपाठी प्रेमात इतकी वेडी होती की, आपलं प्रेम वाचवण्यासाठी ‘नको त्या’ केल्या…
Mr And Mrs Mahi : राजकुमार रावचा स्पोर्ट्स ड्रामा; जान्हवी कपूरच्या एका स्माईलवर फॅन्स फिदा