बेळगावा : तीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यु
बेळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : बोकनूर (ता.बेळगाव) येथे तीन वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत पडल्याने बुडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.12) घडली. शार्दुल हनुमंत पाटील (रा. शिरोळी खुर्द, ता. चंदगड) असे मृताचे नाव आहे.
शार्दुलचे आजोळ शिनोळी खुर्द गावची यात्रा असल्याने त्याची आई शार्दुलला घेऊन बोकनूर येथे गेली होती. मुलाला घरी सोडून त्याची आई गल्लीतील लोकांना आमंत्रण देण्यासाठी गेली. दरम्यान शार्दुल खेळता खेळता शेजाऱ्यांच्या अंगणात गेला होता. तेव्हा समोरील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे होते. त्यामध्ये पाय घसरून पडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, त्याला पाण्यातून बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
हेही वाचा :
मोदी, शहा यांच्याकडे ईडी-सीबीआयच्या चाव्या : मल्लिकार्जुन खर्गे
कोल्हापूर : ‘बिद्री ‘च्या लेखापरीक्षण आदेशाचे स्वागतच : के. पी. पाटील
कोल्हापूर : कासारी धरणात ३४ टक्के पाणीसाठा