…तर मला तुरुंगात जावे लागणार नाही : अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : तुम्ही सर्वांनी आम आदमी पक्षाला मतदान केले, तर मला तुरुंगात जावे लागणार नाही, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी प्रचारादरम्यान केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. दिल्ली आणि पंजाबच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो आणि बैठकांचा धडाका लावला आहे. रविवारी त्यांनी दिल्लीत रोड शो केला. यावेळी मतदारांना आवाहन करताना केजरीवाल म्हणाले, मला 20 दिवसांनंतर तुरुंगात परत जावे लागेल. जर तुम्ही झाडूला (आपचे चिन्ह) मतदान केले तर मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही.
हेही वाचा :
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा : बावनकुळे
मोदी, शहा यांच्याकडे ईडी-सीबीआयच्या चाव्या : मल्लिकार्जुन खर्गे
Arvind Kejriwal: देशभरात 200 युनिट मोफत वीज : केजरीवालांनी जाहीर केल्या १० गॅरंटी