मुंबई : मानखुर्द मंडाला येथे पुन्हा एकदा अग्नितांडव; स्क्रॅप कंपाऊंडला आग

मुंबई : मानखुर्द मंडाला येथे पुन्हा एकदा अग्नितांडव; स्क्रॅप कंपाऊंडला आग

मानखुर्द, Bharat Live News Media वृत्तसेवा : मानखुर्द मंडाला येथील कुर्ला स्क्रॅप कंपाऊंडला रविवारी (दि.१२) संध्याकाळी पुन्हा एकदा भीषण आग लागली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत तेल, लाकूड, प्लास्टिक अशा ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आगेने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगेची माहिती मिळताच दहा-बारा आग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अखेर दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली.
मानखुर्दच्या या कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाच्या वखारी, प्लॅस्टिकचे गोदाम, काळ्या तेलाचे गोदाम आणि अनेक ज्वलनशील वस्तूंची गोदाम आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत असतात. तरीही येथील अनधिकृत गोदामे हटविणे प्रशासनाला अशक्य झाले आहे. या कंपाऊंडमधील काही गोदामात ठेवलेल्या लाकडांना रविवारी (दि.१२) आग लागली. ज्वलनशील साहित्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग इतकी भीषण होती की, ही आग विझवण्यासाठी दहा-बारा गाड्या आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी होत्या. अखेर दोन तासांनी आग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत कोणीही जखमी झाले नाही, मात्र मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. गेल्या काही वर्षात वारंवार या ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा :

बोकनूरमध्ये तीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यु
जळगाव: वाकडी येथे अंगावरील दागिने ओरबडून वृद्धेचा खून
नाशिक येथे बंद फ्लॅटमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह