परभणी: राणीसावरगाव येथील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले
राणीसावरगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा: गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील ३२ वर्षीय युवकाने गळफास लावून जीवन संपविले. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री१२ ते १ च्या दरम्यान घडली. या घटनेमागील कारण समजू शकलेले नाही.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदानंद (सर्जेराव) सुदाम सुरुळे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण संध्याकाळी घरून जेवण करून गेला. त्यानंतर घरी परत आला नाही. सकाळी वडील सुदाम यांनी बाजार मार्केटमधील दुकान उघडले असता दुकानातील लाकडाला गळफास लावलेल्या अवस्थेत सदानंदचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आला. मृताच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.
हेही वाचा
परभणी: कोल्हेवाडी येथे पीककर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवन संपविले
परभणी: रेडिमेड कपड्यांनी आणली टेलरिंगच्या व्यवसायावर गदा
परभणी : पूर्णा स्थानकातील रेल्वेच्या डब्यात आढळला महिलेचा मृतदेह