विनापरवाना सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त, एफडीएची कारवाई
जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा – विना परवाना सीलबंद पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या मे. देवांश सेल्स या पेढीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली असता 4 लाख 10 हजार रुपये किमतीचा पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. विनापरवाना सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.
जळगाव कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार, सहायक आयुक्त संतोष कृ. कांबळे, सह आयुक्त,(नाशिक विभाग) सं.भा.नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एमआयडीसी परिसरातील ढोर मार्केट येथे मे. देवांश सेल्स या पेढीवर धाड टाकण्यात आली. पेढीकडे आवश्यक अन्न परवाना नसताना सुद्धा जळगाव शहरात व जिल्हयात सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्याची (उत्पादक प्रामुख्याने गुजरात जिल्हयातील ) विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. या पेढी मध्ये 4 लाख 10 हजार किमतीच्या पाण्याच्या बाटल्यांचा अन्न सुरक्षा मानके कायदयान्वये साठा जप्त करण्यात आला.
सर्व अन्न व्यावसाईकांनी कोणताही अन्न व्यवसाय करण्याआधी अन्न परवाना/नोंदणी प्राप्त करुन घ्यावी असे सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी कळवले आहे.
हेही वाचा –
The Sabarmati Report : राशी खन्ना-विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ ची नवी तारीख जाहीर
जळगाव व रावेरसाठी चौथ्या दिवशी किती उमेदवारांनी किती अर्ज घेतले, वाचा…