नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहिर केली आहे. पक्षा कडून सोमवारी (दि. २२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणूकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२६) ऊमेदवारी अर्ज दाखल करायची प्रक्रिया सुरु होत आहे. नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा करत आघाडी घेतली आहे. तर महायुतीमध्ये उमेदवारीवरून वाद अद्यापही वाद कायम आहे. अशा परिस्थितीत वंचित निवडणूकीच्या रिंगणात कोणाला उतरविणार यावरून सस्पेंन्स कायम होता.
महाविकास आघाडीशी जागा वाटपावरुन फिस्कटल्यानंतर वंचितने राज्यात स्वतंत्र चुल मांडली आहे. त्यानुसार आठवड्याभरापूर्वी दिंडाेरीतून गुलाब बर्डे यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली होती. मात्र, वंचितकडून रविवारी (दि.२१) बर्डे यांचा पत्ता कट करून मालती थविल यांना तिकिट देण्यात आले. एकीकडे दिंडोरीत उमेदवार बदलत वंचितने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला असताना नाशिकच्या जागेसंदर्भात निर्णय राखून ठेवला होता. त्यामूळे राजकीय क्षेत्रात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर वंचितने गायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने नाशिकची लढत रंगतदार होणार आहे.
हेही वाचा –
बीड: माऊली फाट्यावरील अपघातातील जखमीची मृत्यूशी झुंज अपयशी; भावापाठोपाठ मृत्यू
Sakri Lok Sabha Elections | साक्री तालुक्यात 5 ते 7 मे दरम्यान मद्यविक्रीस बंदी, हे आहे कारण
Marathi Movie : संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली