बीड: माऊली फाट्यावरील अपघातातील जखमीची मृत्यूशी झुंज अपयशी; भावापाठोपाठ मृत्यू

धोंडराई, पुढारी वृत्तसेवा : उमापूर- शेवगाव रोडवर पिकअप व दुचाकीचा झालेल्या अपघातात सख्ख्या भावापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी एका भावावर बीड व नंतर संभाजीनगरला घाटीमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मुत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आज (दि. २२) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उमेश सांगळे असे त्यांचे नाव आहे. आज सकाळी शवविच्छेदनांतर …

बीड: माऊली फाट्यावरील अपघातातील जखमीची मृत्यूशी झुंज अपयशी; भावापाठोपाठ मृत्यू

धोंडराई, Bharat Live News Media वृत्तसेवा : उमापूर- शेवगाव रोडवर पिकअप व दुचाकीचा झालेल्या अपघातात सख्ख्या भावापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी एका भावावर बीड व नंतर संभाजीनगरला घाटीमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मुत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आज (दि. २२) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उमेश सांगळे असे त्यांचे नाव आहे.
आज सकाळी शवविच्छेदनांतर उमेश यांचा मृतदेह उमापूर येथे आणण्यात आला. सांयकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सख्ख्या भावांच्या अशा दुर्दैवी मृत्यूवर उमापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हा अपघात शनिवारी (दि.२०) गेवराई तालुक्यातील माऊली फाट्यावर झाला होता. मासे वाहतूक करणारा पिकअप व दुचाकीचा गेवराई तालुक्यातील माऊली फाट्यावर अपघात झाला होता. यात उमापूर येथील रहिवासी दादासाहेब सांगुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश सांगुळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.
गेवराई येथून सांगुळे बंधू आपली कामे आटोपून दुचाकीवरून (एमएच २३ व्ही एच ७७३२) उमापूरकडे जात होते. यावेळी तळणेवाडी आणि माऊली संस्थान बोरी पिंपळगाव फाट्यानजीक शेवगावकडून अंबडकडे जाणाऱ्या मासे वाहतूक करणाऱ्या पिकअपची (जीतु एमएच २१ बी एच ५७३७) आणि दुचाकीचा अपघात झाला होता.
हेही वाचा 

बीड : केजमध्ये भाच्याच्या लग्नाला निघालेल्या मामाचा अपघातात मृत्यू
बीड: उमापूर- शेवगाव रस्त्यावरील अपघातात सख्ख्या भावाचा मृत्यू; एक जण गंभीर
बीड: गेवराई येथे अवैध वाळू वाहतूक करणारे तीन हायवा पकडले: सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त