कोल्हापूर : नरतवडे येथे वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून

सरवडे; पुढारी वृत्तसेवा : नरतवडे (ता. राधानगरी) येथे एका वृद्ध महिलेचा ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. आक्काताई केशव रामाणे (वय ६५) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत वृद्ध महिलेचा मुलगा बाळासो केशव रामाणे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, रामाणे या …

कोल्हापूर : नरतवडे येथे वृध्द महिलेचा दगडाने ठेचून खून

सरवडे; Bharat Live News Media वृत्तसेवा : नरतवडे (ता. राधानगरी) येथे एका वृद्ध महिलेचा ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे.
आक्काताई केशव रामाणे (वय ६५) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत वृद्ध महिलेचा मुलगा बाळासो केशव रामाणे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, रामाणे या नरतवडे येथील डोंगरालगतच्या शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या घरी परत न आल्याने मुलगा बाळासो रामाणे हे घटनास्थळी गेले यावेळी त्यांना ऊसाच्या सरीत त्यांच्या आई अक्काताई यांचा दगडाने खून झाल्याचे आढळून आले.  दरम्यान त्यांच्या अंगावर सोने नसल्याचे देखील आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांंनी घटनास्थळी धाव घेतली. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. या खुनाच्या घटनेची माहिती समजताच परिसरात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
घटनानास्थळाचा पोलीसांनी रीतसर पंचनामा करुन मृतदेह सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अक्कताई यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातु असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश घिर्डीकर, हवालदा कृष्णात यादव, शुभांगी जठार, कृष्णात खामकर, दिगंबर बसरकर, किरण पाटील, रघुनाथ पोवार करत आहेत.