गोवा: मुख्यमंत्री सावंत प्रचार करताना लिफ्टमध्ये अडकले

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक दौऱ्यावर असताना लिफ्टमध्ये अडकल्याची घटना आज (दि. ४) घडली. मात्र, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. आज डॉ. सावंत लोकसभा निवडणुकीसाठी बेंगळूर येथे पोहोचल्यानंतर भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या यांच्यासोबत त्यांनी तेथील स्थानिक  हॉटेलमध्ये चहा, नाश्ता केला. यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बेंगलोर येथे भाजपचे … The post गोवा: मुख्यमंत्री सावंत प्रचार करताना लिफ्टमध्ये अडकले appeared first on पुढारी.

गोवा: मुख्यमंत्री सावंत प्रचार करताना लिफ्टमध्ये अडकले

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक दौऱ्यावर असताना लिफ्टमध्ये अडकल्याची घटना आज (दि. ४) घडली. मात्र, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. आज डॉ. सावंत लोकसभा निवडणुकीसाठी बेंगळूर येथे पोहोचल्यानंतर भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या यांच्यासोबत त्यांनी तेथील स्थानिक  हॉटेलमध्ये चहा, नाश्ता केला. यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बेंगलोर येथे भाजपचे लोकसभा उमेदवार डॉ. मंजुनाथ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपली उपस्थिती लावली. Pramod Sawant
त्यानंतर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री व निधर्मी जनता दलाचे प्रमुख एचडी कुमारस्वामी हो मंड्या लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत . त्यांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचीही उपस्थिती होती. यावेळी एक जाहीर सभा घेण्यात आली. त्याआधी मुख्यमंत्री हॉटेलमधील लिफ्टमध्ये कार्यकर्त्यांसह अडकले. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले. Pramod Sawant
दरम्यान,  मंड्या येथे  मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, केंद्रात दहा वर्षे काँग्रेसची सत्ता होती. ते देशासाठी काही करू शकले नाहीत. फक्त घोटाळे केले. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात देशाला बलशाली बनवले. विकसित बनवलेले आणि हा विकास पुढे जाण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे सरकार केंद्रात येणे गरजेचे आहे. कर्नाटकामध्ये भाजपला चांगले वातावरण असून कर्नाटकमध्ये भाजप २८ जागा जिंकणार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी यावेळी केला.
हेही वाचा 

५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे प्रमोद सावंत ठरले गाेव्याचे पहिले मुख्यमंत्री 
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ मागण्याचा- सोडण्याचा प्रश्नच नाही : डॉ. प्रमोद सावंत
काँग्रेस हे फ्रॉड सरकार : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका

Latest Marathi News गोवा: मुख्यमंत्री सावंत प्रचार करताना लिफ्टमध्ये अडकले Brought to You By : Bharat Live News Media.