व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव – तरूणीचे अश्लिल छायाचित्र आणि व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे.  मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी वय ३०, राहूल सुनिल चौधरी वय-२८, सतिष रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण वय-२८ तिघे रा. शेंदुर्णी आणि गणेश संजय सोनवणे रा. मध्यप्रदेश या चौघांनी तरूणीला तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
यातील संशयित आरोपी सुदाम संभाजी कोळी याने पिडीत तरूणीवर मार्च २०२३ ते १८ ऑक्टोर २०२३ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. राहूल चौधरी, सतिष नाईक, गणेश सोनवणे यांनी पिडीत तरूणीला अनवान्टेंड गोळ्या देवून सुदाम कोळी याला मदत करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पिडीत तरूणीने ३ एप्रिल रोजी रात्री पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.
हेही वाचा –

Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सच्या ‘सूर्या’वरचे ग्रहण कधी सुटणार?
BJP on Ramdas Kadam : ‘हा गरमपणा स्वाभिमानाचा, हुजरेगिरीचा नाही; भाजपचा रामदास कदमांवर निशाणा
दलित पँथर संघटनेचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा

Latest Marathi News व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.