पालिकेच्या डायलिसिस सेंटरला रुग्णांची पसंती; 65 हजार रुग्णांनी घेतला लाभ

पालिकेच्या डायलिसिस सेंटरला रुग्णांची पसंती; 65 हजार रुग्णांनी घेतला लाभ

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने शहरात सात ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आली आहेत. यापैकी दोन सेंटरमधील मशिन महापालिकेच्या मालकीची आहेत. उर्वरित सेंटर खासगी संस्थांना चालवण्यास देण्यात आली आहेत. सर्व डायलिसिस सेंटरमधील एकूण 57 मशिनवर वर्षभरात 64,387 रुग्णांनी डायलिसिसचा लाभ घेतला आहे. भारतामध्ये साधारणपणे दरवर्षी एक लाख रुग्णांना किडनीचे आजार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये मधुमेह व हृदयरोगाचे रुग्ण जास्त प्रमाणावर आढळून येत असून त्यामुळे किडनीचे आजार वाढत आहेत. अशा वेळी नियमितपणे डायलिसिस सेवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.
किडनीच्या रुग्णांना आवश्यकतेनुसार आठवड्यातून किमान एकदा डायलिसिसची आवश्यकता भासते. यासाठी खाजगी रुग्णालयात सुमारे दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. महापालिकेच्या डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांना 400 रुपये दराने डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
महापालिकेच्या डायलिसिस सेंटरमध्ये 57 मशिन नागरिकांच्या सेवेत सज्ज आहेत. पीपीपी तत्त्वावरील डायलिसिस प्रकल्पामुळे गरीब व गरजू रुग्णांना डायलिसिससारखे महागडे उपचार अत्यल्प दरामध्ये उपलब्ध झाले आहेत.या प्रकल्पाअंतर्गत 64,387 रुग्णांनी डायलिसिसचा लाभ घेतला आहे.
– डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, महानगरपालिका

सेंटरचे नाव मशिन डायलिसिस रुग्ण

कमला नेहरू रुग्णालय 12 38917
राजीव गांधी रुग्णालय, येरवडा 10 17737
कै. चंदूमामा सोनवणे हॉस्पिटल, भवानी पेठ 4 2439
कै. शिवरकर दवाखाना, वानवडी 10 1929
कै. अरविंद गणपत बारटक्के दवाखाना, वारजे 4 162
कै. रखमाबाई थोरवे दवाखाना आंबेगाव 7 503
कै. मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह कोंढवा 10 2700
कै. द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना बोपोडी 10 0
(कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.)

हेही वाचा

कोल्‍हापूर : दानोळीत पती-पत्नीला बेदम मारहाण करून दीड तोळे सोने लंपास
आरोग्य प्रमाणपत्रासाठी भावी नोकरदारांची फरपट; तरुणांमध्ये नाराजी
‘नेट’चे अर्ज भरण्याच्या वेळापत्रकाबाबत मोठी माहिती समोर..

Latest Marathi News पालिकेच्या डायलिसिस सेंटरला रुग्णांची पसंती; 65 हजार रुग्णांनी घेतला लाभ Brought to You By : Bharat Live News Media.