चांदवडला ८ लाखांचा गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

चांदवड : पुढारी वृत्तसेवा- इंदूर (मध्यप्रदेश) येथून मुंबईच्या दिशेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा मालट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर पकडला. ८ लाख १५ हजारांच्या गुटख्यासह १८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांना ताब्यात घेत एकास अटक झाली आहे. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना मिळालेल्या माहितीवरुन वडबारे फाट्यावरील इच्छापूर्ती हॉटेलसमोर ही कारवाई … The post चांदवडला ८ लाखांचा गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक appeared first on पुढारी.

चांदवडला ८ लाखांचा गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

चांदवड : Bharat Live News Media वृत्तसेवा- इंदूर (मध्यप्रदेश) येथून मुंबईच्या दिशेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा मालट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर पकडला. ८ लाख १५ हजारांच्या गुटख्यासह १८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांना ताब्यात घेत एकास अटक झाली आहे.
पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना मिळालेल्या माहितीवरुन वडबारे फाट्यावरील इच्छापूर्ती हॉटेलसमोर ही कारवाई झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडबारे फाटा येथे सापळा लावला होता. संशयित ट्रक (एम. पी. ०९, एच. एफ. ३८२३) ची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू, जर्दा व गुटखा आढळून आला. यात एक लाख ६३ हजारांचा जर्दा, सहा लाख ५२ हजार ८०० रुपयांचा सुंगधित मसाला मिळून आला. ट्रक, मोबाईलसह एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस शिपाई विनोद टिळे यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिली. आरोपी कैलास कालुराम बरी (४३, रा. नियानी खिची, ता. नलखेडा, मध्यप्रदेश), माल पाठविणारा दिनेश (रा.पालदा, इंदुर) व माल विकत घेणारा राजेशभाई (रा.मुंबई, माटुंगा) पूर्ण नाव माहिती नाही, यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा :

डायल 112 प्रणाली अचूकपणे राबवल्याने धुळे जिल्हा राज्यात तृतीय स्थानी, तर नाशिक विभागात अव्वल
Washim News : पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
‘मला वेगवान गोलंदाज बनायचे नाही’, Mayank Yadavचे धक्कादायक विधान

Latest Marathi News चांदवडला ८ लाखांचा गुटखा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल, एकास अटक Brought to You By : Bharat Live News Media.