चंद्रपूर: नवेगाव शिवार येथील सूनेच्या खूनप्रकरणी सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात दगडी फरशीच्या तुकड्याने डोक्यावर वार करून सूनेचा खून करणाऱ्या सासऱ्यास जिल्हा सत्र न्यायालयाने आज (दि.१) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत काळे यांनी ही शिक्षा सुनावली. भुजंग झित्रु कन्नाके असे शिक्षा झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. याबाबत अधित माहिती अशी की, १२ एप्रिल २०२१रोजी दुपारी बाराच्या सुमारास … The post चंद्रपूर: नवेगाव शिवार येथील सूनेच्या खूनप्रकरणी सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

चंद्रपूर: नवेगाव शिवार येथील सूनेच्या खूनप्रकरणी सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात दगडी फरशीच्या तुकड्याने डोक्यावर वार करून सूनेचा खून करणाऱ्या सासऱ्यास जिल्हा सत्र न्यायालयाने आज (दि.१) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत काळे यांनी ही शिक्षा सुनावली. भुजंग झित्रु कन्नाके असे शिक्षा झालेल्या सासऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधित माहिती अशी की, १२ एप्रिल २०२१रोजी दुपारी बाराच्या सुमारास पोलीस स्टेशन पोंभुर्णा हद्दीतील मौजा चेक नवेगाव शिवारात आरोपी भुजंग झित्रु कन्नाके (वय ५२) याने आपली सून गीता दीपक कन्नाके हिचा घरगुती वादातून दगडी फरशीच्या तुकडयाने डोक्यावर घाव घालून खून केला होता.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोंभुर्णा येथे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पोलीस उपनिरीक्षक दादाजी ओलालवार यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपीविरोधात सबळ पुरावे सादर करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. त्याआधारे भुजंग यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि ५०० रूपयांचा दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरीक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
हेही वाचा  

Lok Sabha Election 2024 | चंद्रपूर : भाजप-काँग्रेस यांच्यात अटीतटीचा रणसंग्राम
Lok Sabha elections 2024 : चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसची उमेदवारी 
Vijay Wadettiwar : नागपूर,चंद्रपूरसह काँग्रेसचे २० खासदार निवडून येतील: विजय वडेट्टीवार

Latest Marathi News चंद्रपूर: नवेगाव शिवार येथील सूनेच्या खूनप्रकरणी सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.