संजय राऊत राजकारणातील केश्टो मुखर्जी: संजय शिरसाट

संजय राऊत राजकारणातील केश्टो मुखर्जी: संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर: Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत उठसूठ कोणावरही टीका करत आहेत. नुकतीच त्यांनी पंतप्रधान मोदीवर टीका केली. त्यांची लायकी आहे का ?, असा सवाल करून राऊत हे राजकारणातील केस्टो मुखर्जी आहेत, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी (दि.१) माध्यमांशी संवाद साधताना केली. Sanjay Shirsat on Sanjay Raut
नुकतीच वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकी बाबत माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीच्या जागावाटप संदर्भात फडणवीस, अजित पवार, यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली आहे. नाशिक, सिंधुदुर्ग- रत्नागिरी, संभाजीनगर या जागा लढविण्यााबाबत चर्चा झाली. या जागा शिवसेनेच्या आहेत. त्या शिवसेनेकडेच कायम राहणार आहेत. Sanjay Shirsat on Sanjay Raut
छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत निर्णय झाला असून येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. संभाजीनगरचा उमेदवार हा स्थानिकच असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नाशिक आमचाच मतदारसंघ असल्याने तेथे आम्ही उमेदवार देणार आहोत, असे ते म्हणाले.
१६ जागा मिळतील
नुकतेच महायुतीतील मित्र पक्षांनी उमेदवार घोषित केले आहेत. त्यात भाजपने १४, शिवसेना शिंदे गटाने ८ आणि २ राष्ट्रवादीने २ राहिलेल्या जगावर बोलणी झाली आहे. शिंदे गटाला १६ जागा मिळतील, त्यापेक्षा कमी नाही, अशीही माहिती शिरसाट यांनी दिली.
Sanjay Shirsat on Sanjay Raut अनेकांचा छुपा पाठिंबा
काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांचा आम्हाला छुपा पाठिंबा आहे. ते नेते आमच्या सोबत येतील.
मुख्यमंत्री निर्णय घेतील
उमेदवार बदलायचे की नाही याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठवाड्यामध्ये देखील किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या दोनच ठिकाणी उमेदवारी जाहीर झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी एक दोन जागा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा 

Sanjay Shirsath : छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनाच लढवणार : संजय शिरसाठ
Maharashtra Politicl Crisis : अजित पवारांमुळे शिंदेंच्या सेनेत नाराजी; संजय शिरसाट म्हणाले…
Maharashtra Politics | जयंत पाटील भाजपच्या वाटेवर, संजय शिरसाट यांचा दावा

Latest Marathi News संजय राऊत राजकारणातील केश्टो मुखर्जी: संजय शिरसाट Brought to You By : Bharat Live News Media.