वाशिम: पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

वाशिम: पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

वाशिम, Bharat Live News Media वृत्तसेवा : बंजारा समाज बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी १७ एप्रिलरोजी रामनवमी यात्रा महोत्सव होणार आहे. त्यासाठी पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आज (दि. १) जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात घेतला. Washim News
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आदी उपस्थित होते. Washim News
श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या,यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी समन्वयातून काम करावे. पाण्याची मुबलक उपल्‍बधता ठेवावी, जेणेकरुन नागरिकांची गैरसोय होणार नाही. यात्रेच्या अनुषंगाने अंघोळीसाठी व्यवस्था करण्यात यावी. तसेच महिला भावि‍कांच्या स्नानासाठी स्वतंत्र स्नानगृहे तयार करावेत. अशा सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
यात्रेच्या कालावधीत पोहरादेवी येथे आरोग्य विभागाने २४ तास दोन आरोग्य पथके तैनात ठेवावी. दोन रूग्णवाहिका उपलब्ध असाव्यात. पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. ज्या स्त्रोतामधून पाणी उपलब्ध होणार आहे, त्याची तपासणी करण्यात यावी. पाण्यामध्ये ब्लिचींग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. यात्रेदरम्यान २४ तास वीज पुरवठा सुरु ठेवावा. तसेच अनुषंगिक पायाभूत सुविधा पुरवाव्यात. पोहरादेवीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची कामे संबंधित विभागाने सुरु करावी.
अतिक्रमणे त्वरीत काढण्यात यावी. तात्पुरती शौचालये सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारावी. पोहरादेवीच्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतींना देखील पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. मच्छरांचा प्रतिबंध करण्यासाठी पोहरादेवी येथे फॉगींग मशीन, स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ, अग्निशमन यंत्रणा व घंटागाडयांची व्यवस्था करण्यात यावी. दर्शन रांगेसाठी बॅरीकेटसची व्यवस्था करावी. कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण व सुरक्षेकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. पार्किंगची व्यवस्था करावी.
यावेळी महंत जितेंद्र महाराज व सुनिल महाराज व शेखर महाराज यांनी यात्रेच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी मांडून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थि‍त होते.
हेही वाचा 

वाशिम: रिसोडमधून मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; वाड्या-वस्त्या ओसाड
वाशिम : कारंजा ते अमरावती रस्त्यावर कारमध्ये ३६ लाखांची रक्कम; स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई
वाशिम नगरपरिषदेकडून शहरात दूषित पाणीपुरवठा

Latest Marathi News वाशिम: पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा Brought to You By : Bharat Live News Media.