नागपूर : गडकरी-पारवे भरणार आज अर्ज, महायुतीच्या नेत्यांची हजेरी

नागपूर : गडकरी-पारवे भरणार आज अर्ज, महायुतीच्या नेत्यांची हजेरी

नागपूर ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे आज (बुधवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी गडकरी यांच्या निवासस्थानी गडकरींनी कुलदेवतेचे आशीर्वाद घेतले. या दोन्ही उमेदवारांचे कांचन गडकरी व कुटुंबियांकडून मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यानंतर गडकरी संविधान चौकाकडे रवाना झाले. या ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, विधानभवनासमोर गोंड राजे बख्त बुलंदशाह यांना अभिवादन केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हजारो कार्यकर्त्यांसह मिरवणूकीने रवाना होणार आहेत.
मंगळवारी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने कधी नव्हे ते काँग्रेस नेत्यांचे एकजुटीचे आणि हजारो कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले. रामटेक लोकसभा मतदारसंघातील माजी मंत्री सुनील केदार गटाच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे या देखील आजच नामांकन दाखल करणार असल्याने पुन्हा एकदा माजी मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने काँग्रेस, मविआ शक्तिप्रदर्शन करणार आहे.
नागपुरात सुनील केदार यांना धक्का !
काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांचे निष्ठावंत माजी जिप उपाध्यक्ष मनोहर कुंभारे भाजपच्या वाटेवर आहेत. गडकरी यांच्याकडे प्रवेश होणार असल्‍याचे समोर येत आहे. आज केदार समर्थक काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे नामांकन दाखल होणार असताना केदार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा : 

Chhattisgarh | छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत ६ नक्षलवादी ठार 
Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक ठरणार जगात सर्वात महागडी ?

Shantigiri Maharaj : उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढू, शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम 

Latest Marathi News नागपूर : गडकरी-पारवे भरणार आज अर्ज, महायुतीच्या नेत्यांची हजेरी Brought to You By : Bharat Live News Media.