‘बडे मिया छोटे मिया’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगर ॲक्शन अवतारात

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बडे मियां छोटे मियां’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूप इंटरेस्टिंग आहे. यामध्ये अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन अवतारात दिसले. ( Bade Miyan Chote Miyan) बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट ‘बडे मिया छोटे मिया’ सातत्याने चर्चेत आहे. चित्रपटाचे टीजर आणि गाणी समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटांविषयी खास … The post ‘बडे मिया छोटे मिया’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगर ॲक्शन अवतारात appeared first on पुढारी.
‘बडे मिया छोटे मिया’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगर ॲक्शन अवतारात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘बडे मियां छोटे मियां’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूप इंटरेस्टिंग आहे. यामध्ये अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन अवतारात दिसले. ( Bade Miyan Chote Miyan) बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट ‘बडे मिया छोटे मिया’ सातत्याने चर्चेत आहे. चित्रपटाचे टीजर आणि गाणी समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटांविषयी खास उत्साह पाहायला मिळाला. ( Bade Miyan Chote Miyan)
प्रेक्षकांचा उत्साह पाहता चित्रपट निर्मात्यांनी आज ‘बडे मिया छोटे मिया’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय-टायगर जबरस्त ॲक्शन करताना दिसणार आहे.
गोळीबार आणि बॉम्बस्फोटाने भरपूर ट्रेलर
‘बडे मिया छोटे मिया’च्या निर्मात्यांनी आज मंगळवारी, २६ मार्च रोजी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलर गोळीबारात आणि बॉम्बस्फोटात सोबत दमदार ॲक्शनने भरपूर आहे. अक्षय कुमार-टायगर श्रॉफ एक वेगळ्या लेव्हलचे स्टंट करताना दिसत आहेत. यामध्ये दोन्ही स्टार देशातील एक अशा शत्रूचा खात्मा करण्यासाठी निघाले आहेत, ज्याच्याविषयी कुणाला काही माहिती नाही. हा शत्रू देश उद्धवस्त करण्याचे स्वप्न पाहतोय. चित्रपटामध्ये शत्रूसोबत अक्षय-टायगरची लढाई पाहायला मिळेल.
एकमेकांचे शत्रू होतात अक्षय-टायगर
टायगर-अक्षय ट्रेलरमध्ये म्हणताना दिसत आहे, ‘दिल से सोल्जर दिमाग से शैतान हैं हम..बच के रहना हमसे हिंदुस्तान हैं हम’. अक्षय-टायगरची जोडी आपल्या अंदाजात शत्रूला हरवण्यात लागली आहे. पण ट्रेलरच्या अखेरीस ही ॲक्शन जोडी एक-दुसऱ्यांचे शत्रू बनते. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हाचादेखील जबररस्त अभिनय दिसत आहे.

यादिवशी रिलीज होणार चित्रपट
चित्रपटामध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अलाया एफ आणि मानुषी छिल्लर शिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांची आहे. वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशु किशन मेहरा, अली अब्बास जफर निर्माते आहेत. चित्रपट ईदच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर १० एप्रिल २०२४ रोजी रिलीज होईल.
Latest Marathi News ‘बडे मिया छोटे मिया’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगर ॲक्शन अवतारात Brought to You By : Bharat Live News Media.