रायगड, शिरूरच्या उमेदवारांची अजित पवारांकडून घोषणा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे निवडणूक लढवतील. तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे, अशी घोषणा आज (दि.२६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तर २८ मार्चला बारामतीचा उमेदवार जाहीर करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांची शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी होणार आहे.
पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. जागा वाटपांचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. महायुतीतील पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज नाहीत. तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचे समाधान होईल, असे लोकसभेसाठी जागांचे वाटप करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करत आहे. महायुतीच्या स्टार प्रचारकांची यादीही तयार करण्यात आली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गट लढविणार आहे. भाजपचे नेते खासदार उदयनराजे यांची समजूत काढत आहेत, असेही पवार म्हणाले. महायुती सहभागी झालेले रासप नेते महादेव जानकर बारामतीमधून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही केवळ कपोलकल्पित चर्चा आहे. नुसती अफवा आहे, असे स्पष्ट केले.
हेही वाचा
NCP Crisis : शरद पवार गटाकडून अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार; सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा
बीड : बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला धक्का; पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा
नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राजगुरूनगरला बैठक; अजित पवार उपस्थित
Latest Marathi News रायगड, शिरूरच्या उमेदवारांची अजित पवारांकडून घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.