‘संयम ठेवा…’ कंगना राणावत जे. पी. नड्डा यांच्या भेटीला

‘संयम ठेवा…’ कंगना राणावत जे. पी. नड्डा यांच्या भेटीला

Bharat Live News Media ऑनालईन डेस्क : काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत यांच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ( Kangana Ranaut ) सध्या दिल्लीला रवाना झाली आहे. दिल्लीत ती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहे. याच दरम्यान कंगनाला सुप्रिया श्रीणेत यांच्या पोस्टबद्दल पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारण्यात आलं. या प्रश्नाची उत्तरे देताना तिने अजून याबद्दल ठोस अशी काही कार्यवाही करत नसल्याचे म्हटलं आहे. मी फक्त दिल्लीला जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यास जात आसल्याचेही तिने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या 

Bade Miyan Chote Miyan चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगर ॲक्शन अवतारात

Kangana Ranaut-Urmila Matondkar : ‘उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पोर्न स्टार…’; कंगनाचा जुना व्हिडिओ व्हायरल
Kangana Ranaut on Supriya Shrinate: काँग्रेस नेत्याची ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट; कंगणा राणावत म्हणाली, स्त्री शरीराच्या…

अभिनेत्री कंगना राणावतला ( Kangana Ranaut ) भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले आहे. यानंतर कंगनाचा एक फोटो शेअर करत काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत यांनी लिहिले होते की, ‘कोणी सांगू शकेल का की बाजारात काय किंमत आहे?’. या पोस्टनंतर सोशल मीडियात एकच खळबळ उडाली होती. यानंतर कंगनानेही याचे जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर कंगना राणावर बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेटीसाठी दिल्लीला रवाना झाली आहे.
”मी आधीच त्यांना माझे प्रत्युत्तर दिलं आहे. आता मिटिंगसाठी दिल्लीला जेपी नड्डा यांनी बोलविले आहे. मिटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन. मी एक अभिनेत्री असून देशातील कोणत्याही महिलेचा कोणताही व्यवसाय असो त्याची एक प्रतिष्ठा असते आणि ती आपण जपली पाहिजे. राजकारणी, पत्रकार, अभिनेत्री, शिक्षक, सोशल वर्कर या कोणत्याही महिलेची एक वेगळी प्रतिष्ठा असते. कोणत्याही महिलेचा अपमान करणे हे याचे मला दु:ख झाले. मंढी हे गाव चांगले आहे.” असेही म्हटलं आहे.
याशिवाय या घटनेवर काही अॅक्शन घेणार काय? असे पत्रकारांनी विचारताच कंगनाने काही स्पष्टपणे उत्तर दिलेले नाही. आज जेपी नड्डा यांना मी भेटण्यास जात आहे. तुम्ही संयम ठेवा. यानंतर जे काही असेल ते स्पष्ट होईलच. असेही कंगना यावेळी म्हटलं आहे.

#WATCH | BJP candidate from HP’s Mandi, Kangana Ranaut arrives in Delhi, to meet party president JP Nadda today pic.twitter.com/YdKeuaXq6U
— ANI (@ANI) March 26, 2024

#WATCH | “Every woman deserves dignity…,” says Kangana Ranaut, BJP candidate from HP’s Mandi Lok Sabha seat on Congress leader Supriya Shrinate’s objectionable post pic.twitter.com/kLt0h7Imq9
— ANI (@ANI) March 26, 2024

Latest Marathi News ‘संयम ठेवा…’ कंगना राणावत जे. पी. नड्डा यांच्या भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.