लोकायुक्तांच्या जनसंपर्क बैठकीत 17 तक्रारी दाखल
हलगा ग्रा. पं. च्या इमारत बांधकामाची पाहणी : काही तक्रारींचा समक्ष सोक्षमोक्ष : संबंधितांना लोकायुक्त कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना
खानापूर : बेळगाव जिल्हा लोकायुक्त अधिकाऱ्यांची जनसंपर्क बैठक बुधवारी दुपारी खानापूर येथील रेल्वेस्टेशनजवळील नगरपंचायतीच्या समुदाय भवनात आयोजित केली होती. या बैठकीत तक्रारी दाखल करण्यात आल्या. काही तक्रारींचा अधिकाऱ्यांकडून समक्ष सोक्षमोक्ष लावण्यात आला. तर हलगा ग्रा. पं. च्या इमारतीच्या बांधकामाबाबत तक्रारीची दखल घेऊन बांधकामस्थळाची पाहणी करून ग्रा. पं. ची ठराव वही तसेच इतर कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच विकास अधिकारी आणि अभियंत्यांकडून माहिती घेऊन बेळगाव येथील लोकायुक्त कार्यालयात येण्याची सूचना केली आहे. यावेळी लोकायुक्त जिल्हा अधीक्षक हणमंत रायाप्पा एच., उपअधीक्षक भरत रे•ाr, निरीक्षक उस्मान अवटी, निरीक्षक अन्नपूर्णा हे लोकायुक्त अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक हणमंत रायाप्पा म्हणाले, अधिकाऱ्यांनी जनतेची कामे वेळेत पूर्ण करावीत. सामान्य जनतेच्या सरकारी कामात वेळकाढूपणा करू नये. तसेच सामान्य जनतेला आपल्या कामासाठी शासकीय कार्यालयाला खेटे मारण्यास लावू नये. सामान्य जनतेबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करून अधिकारी आणि जनता यांच्यातील अंतर कमी करून सामान्य जनतेला न्याय द्यावा. यावेळी विविध कार्यालयांच्या संदर्भात 17 तक्रारी दाखल करण्यात आल्या. यात हलगा येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या ग्राम पंचायतीच्या इमारतीबाबत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार हलगा ग्रा. पं. सदस्य रणजित पाटील यांनी पुराव्यानिशी केल्याने अधिकाऱ्यांनी बांधकामस्थळी पाहणी करून ग्रा. पं. चे ठराव वही आणि कागदपत्रे ताब्यात घेतली असून, विकास अधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांना कागदपत्रांसह बेळगाव लोकायुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे.
वनखात्याच्या आडमुठ्या धोरणाबाबत तक्रार
खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे यांनी सर्व्हे नंबर 49 या सरकारी तळाच्या जागेबाबत तक्रार केली. यावेळी लोकायुक्तांनी नगरपंचायत आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत योग्य क्रम घेण्याची सूचना केली आहे. तसेच शिरोली ग्रा. पं. चे माजी सदस्य विजय मादार, ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी तालुक्यातील दुर्गम भागातील पूल, रस्ते बांधकामाबाबत वनखात्याच्या आडमुठ्या धोरणाबाबत तक्रार केली. तालुक्यातील काही गावांचे पूल आणि रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे कंत्राटदाराला काम करण्यास देण्यात येत नाही. याबाबत तक्रार करण्यात आली होती. यावेळी लोकायुक्तांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना योग्य सहकार्य करण्याची सूचना केली आहे. खानापूर येथील कृषी अधिकाऱ्यांचे कार्यालय होऊन 25 वर्षे उलटली असून या इमारतीबाबत योग्य कागदपत्रे नसल्याची तक्रारी यशवंत बिरजे यांनी केली. यावेळी लोकायुक्तांनी कृषी अधिकारी बी. बी. चव्हाण यांना याबाबत स्पष्टीकरण विचारुन येत्या काही दिवसात कृषी खात्याच्या इमारतीबाबत कागदपत्रांची पूर्तता करून नाव दाखल करण्याची सूचना करण्यात आली. तसेच सुमित्रा कोळीद्रेंकर यांनी नगरपंचायतीच्या गैरकारभाराबद्दल तक्रार केली. तसेच उपनोंदणी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या विरोधातही तक्रारी दाखल करण्यात आल्या. बैठकीला आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर, पशुसंगोपन खात्याचे अधिकारी डॉ. अस्मित कोडगी, हेस्कॉमच्या कल्पना तिरवीर, वनखात्याच्या अधिकारी निंबरगी, नगरपंचायतीचे अधिकारी यासह सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी लोकायुक्तांच्या जनसंपर्क बैठकीत 17 तक्रारी दाखल
लोकायुक्तांच्या जनसंपर्क बैठकीत 17 तक्रारी दाखल
हलगा ग्रा. पं. च्या इमारत बांधकामाची पाहणी : काही तक्रारींचा समक्ष सोक्षमोक्ष : संबंधितांना लोकायुक्त कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना खानापूर : बेळगाव जिल्हा लोकायुक्त अधिकाऱ्यांची जनसंपर्क बैठक बुधवारी दुपारी खानापूर येथील रेल्वेस्टेशनजवळील नगरपंचायतीच्या समुदाय भवनात आयोजित केली होती. या बैठकीत तक्रारी दाखल करण्यात आल्या. काही तक्रारींचा अधिकाऱ्यांकडून समक्ष सोक्षमोक्ष लावण्यात आला. तर हलगा ग्रा. पं. […]