रयत गल्ली वडगाव येथे घराची भिंत कोसळली

रयत गल्ली वडगाव येथे घराची भिंत कोसळली

बेळगाव : रयत गल्ली, वडगाव येथे घराची भिंत कोसळल्याची घटना सोमवारी रात्री घडली. घराची मुख्य भिंत कोसळल्याने संपूर्ण घर केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. यामुळे तारिहाळकर कुटुंबीयांना आर्थिक फटका बसला असून मदतीची मागणी करण्यात येत आहे. रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला. यामध्ये घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जुन्या मातीच्या भिंती कोसळल्याने रयत गल्ली वडगाव येथील यल्लाप्पा तारिहाळकर यांचे मोठे नुकसान झाले. राहत्या घराची भिंत कोसळल्याने कुटुंबीय बेघर झाले आहेत. अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने कुटुंबीयाला तातडीची मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.